गळफास घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड  येथील तपनेश्वर भागातील भास्कर काशिनाथ बेरड यांच्या पत्नी आशाबाई भास्कर बेरड (वय ३०) यांनी शनिवारी (दि.२३) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू असा परिवार आहे.

Loading...
शहरातील तपनेश्वर भागातील रामेश्वर कॉलीनी येथे राहत असलेले भास्कर बेरड यांच्या पत्नी आशा बेरड यांनी राहत्या घरात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सकाळी सात वाजता घरातील सदस्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याबाबत येथील पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. वैद्यकीय अहवालानुसार जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.