व्यापाऱ्यास बेकायदेशीर अटक केल्याने पोलिस अधिकाऱ्यांना १० लाखांचा दंड !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर येथील व्यापाऱ्याला गुन्हा नसताना अटक केल्या प्रकरणी तोफ खान्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकासह पोलिस उपअधीक्षकांना उच्च न्यायालयाने दणका दिला. 

या दोघांनी व्यापाऱ्याला प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यात ८ टक्के व्याजासह रक्कम जमा करायची आहे. अन्यथा या अधिकाऱ्यांची खासगी मिळकत विक्री करुन रक्कम वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

Loading...
व्यापारी किशोर बोरा यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटल्यानुसार बोरा हे दुध पावडर, डेरी वस्तूंचे होलसेल विक्रेते आहेत. 

बोरा यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसताना तोफखाना पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक निसार शेख व पोलिस उपअधीक्षक रमाकांत जावळे यांनी गुन्हा दाखल करत २ ऑक्टोबर २००५ रोजी पहाटे ४ वाजता अटक केली होती.

त्यानंतर त्यांना कोठडीत घेण्यासाठी पोलिसांनी वाढीव कलमे लावल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. . न्या. ए. व्ही. निरगुडे यांनी गुन्हा रद्द करत बोरा यांना बेकायदेशीर अटक केल्या प्रकरणात त्यांना नुकसान भरपाई का देण्यात येऊ नये, अशी नोटीस अधिकाऱ्यांना बजावली होती.

या प्रकरणात अंतिम सुनावणी झाली असता दोन्ही अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये याचिकाकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश खंडपीठाने दिला. 

दीड महिन्यात रक्कम ८ टक्के व्याजासह अदा करायची आहे. नुकसान भरपाई न दिल्यास अधिकाऱ्यांची स्थावर मालमत्ता विकून रक्कम द्यावी लागणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.