संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईच्या ओळखीतल्या एकाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब मनोहर सोनवणे (रा. नान्नजदुमाला) याला अटक केली आहे. 

Loading...
त्याला शनिवार दि. २३ रोजी संगमनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी भाऊसाहेब सोनवणे याची अत्याचारीत अल्पवयीन मुलीच्या आईबरोबर ओळख होती. 

त्याने मुलीची आई घरी नसल्याचा फायदा घेऊन मुलीला दम देत व तिच्या असहाय्यतेचा फायदा उचलत सन २०१४- २०१५ पासून ते गुरुवार दि. २१ जून २०१८ या कालावधीत मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.