स्वच्छ शहरात शिर्डीचा देशात तिसरा क्रमांक,नगरपंचायतीला मिळणार १५ कोटींचे बक्षीस !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशातील स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात साईंच्या शिर्डीने देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात शिर्डीने हे यश संपादन केले. राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल नगरपंचायतीला पंधरा कोटींचे बक्षीस मिळणार आहे. 

Loading...
शहरे स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने काही मानके ठरवून देशभरातील महापालिका व नगरपालिकांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक घरातील कचरा गोळा करणे, त्याचे ओला व सुका असे विलगीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करून स्वच्छता राखणे, जनजागृती, स्वच्छतेची यंत्रणा सुसज्ज करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, गणवेश, जनजागृती आदी निकषांचा या सर्वेक्षणात समावेश होता.

दिलेल्या मानकांप्रमाणे काम होतेय की नाही, हे तपासण्यासाठी केंद्रीय पथकाने पाहणीही केली. शिर्डी नगरपंचायतीने मानकांप्रमाणे उत्तम कामगिरी केल्याने देशात तिसरा, तर राज्यात दुसरा क्रमांक आला. राज्य सरकारकडून पंधरा कोटींचे नगरपंचायतीला बक्षीस मिळणार आहे.

''शहरातील तरुणांनी ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डीच्या माध्यमातून चार वर्षांपासून काम सुरू केले होते. त्याला यश मिळाले. साईनगरीचे नाव उंचावले पदभार घेताच स्वच्छता ही शिर्डीची गरज समजून कामाला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडे केलेला पाठपुरावा व साई संस्थानची मदत महत्त्वाची ठरली. पंधरा कोटींचे बक्षीस मिळाले याचा आनंद आहेच, पण साईनगरीचे नाव आपण स्वच्छतेच्या बाबतीत उंचावू शकलो याचा अभिमान आहे.'' - योगिता अभय शेळके, नगराध्यक्ष, शिर्डी. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.