संगमनेर तालुक्यात घातक हत्यार बाळगणाऱ्यास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील बोटा येथील अशोक दत्तात्रय जोरी (वय-२८) याला घारगाव पोलिसांनी घातक सुरा जवळ बाळगल्या प्रकरणी अटक केल्याची घटना गुरुवार दि. २१ जून रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. 

Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा याठिकाणी असणारा अशोक जोरी याच्याकडे घातक हत्यार (सुरा) असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांना समजली होती.

त्यामुळे त्यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, सहाय्यक फौजदार कैलास परांडे, पोलिस नाईक संतोष खैरे, विशाल कर्पे, तुळशीराम वायकर यांनी जोरी याच्या घरी छापा टाकला असता तर त्याने हा सुरा पाण्याच्या टाकीखाली लपवून ठेवला होता.

त्यामुळे पोलिसांनी सुरासह त्याला रंगेहाथ पकडले आहे.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अशोक दत्तात्रय जोरी याच्या विरुद्ध गु.रजि.नं. १६/२०१८ भारतीय हत्या कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.