अकोल्यात टँकरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अमृतसागर दूध संघाच्या टँकरची (एमएच १७ बीवाय १४९२) दुचाकीला धडक बसून बारी येथील तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवरील दुसरी व्यक्ती जखमी झाली. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विठे घाटात हा अपघात झाला.
Loading...

नामदेव दुंदा खाडे (१९) याच्या दोन्ही पायावरून टँकर गेल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारांदरम्यान मरण पावला. सागर निवृत्ती खाडे (१८) याची प्रकृती सुधारत असून तो नाशिक येथे उपचार घेत आहे. पोलिसांनी चालक योगेश दामू आवारी यास ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.