कर्जतमध्ये जळालेला अवस्थेतील मृतदेह सापडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील माहिजळगाव - निंबोडी शिवारात खोकर पुलापासून काही अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत व विद्रूप केलेला मानवी सांगाडा गुरूवारी सापडला. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झालेली नव्हती. 


Loading...
माहिजळगावच्या दिशेने काही अंतरावर असलेल्या माळरानात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा सापडला आहे. शरीरावरती कातडे नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मृतदेह पुरुषाचा असावा. सांगाडा बाहेरून आणून येथे टाकला आहे का, याबाबत सखोल तपास केला जाईल, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

याबाबत माहिजळगाव, निंबोडी, तरडगाव, सीतपूर, नागपूर, नागलवाडी, खडकत परिसरात अफवांना उत आला होता. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.