न्यायालयीन प्रक्रिया गतीमान होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट कमिशनर नेमण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- न्यायालयीन प्रक्रिया गतीमान होवून, सर्वसामान्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय दिवाणी न्यायालयांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट कमिशनर नेमण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उच्च न्यायालयास पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
Loading...
जिल्हा व तालुकास्तरीय दिवाणी न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबीत आहे. दहा-दहा वर्षे चकरा मारुन देखील निकाल लागत नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर न्यायलयीन व्यवस्था गतीमान होण्याची गरज असून, ही जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची देखील आहे. न्याय मागणार्‍यांचे वर्षानुवर्षे खटले प्रलंबीत राहत असल्याचे त्यांचे एक प्रकारे शोषण होत आहे. 

न्यायदान प्रक्रियेत पुरावा नोंदण्याचे काम अत्यंत किचकट व वेळखावू आहे. दिवाणी न्यायालयात पुरावा नोंदण्याची कायदेशीर तरतुदीप्रमाणे फौजदारी छोटे व कमी शिक्षेचे खटले कोर्ट कमिशनर हाताळून पुरावा नोंदणीचे काम करणार आहे. 

प्रकरणाचा अंतिम न्याय निवाडा मात्र न्यायालयाचे न्यायाधीश करणार आहे. या फास्ट ट्रॅक कोर्ट कमिशनरसाठी अधिक अनुभवी तथा जेष्ठ वकिलांची नेमणुक करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.राज्यात दहा हजार कोर्ट कमिश्‍नर्सची नेमणुक केल्यास न्यायालयाचे वीस पटीने मनुष्यबळ वाढून न्यायलयीन कामाला गती मिळणार आहे. 

गुंतागुंतीचे व अधिक गंभीर खटले न्यायलय स्वत: हाताळणार आहे. यामुळे लहान कमी शिक्षेचे खटल्यांचे पुरावा नोंदणीचे वेळखावू काम कोर्ट कमिशनर करणार आहेत. नव्याने दाखल होणारे दाव्यांची आकडेवारी मोठी असून, त्याप्रमाणात लागणार्‍या निकालाची आकडेवारी अत्यल्प आहे. 

कोर्ट कमिशनर नेमल्यास खटला लवकर निकाली काढण्यासाठी वादी प्रतिवादी त्यांची फी देखील देण्यास तयार असणार आहे. यासाठी शासनाला कुठलाही खर्च न पडता ही प्रक्रिया गतीमान होवू शकणार असून, न्याय मागणार्‍यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. 

दहा वर्ष प्रलंबीत पडलेले खटले सहा महिन्यातच निकाल लागणार असल्याचा संघटनेचा दावा आहे. या मागणीकरिता अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम प्रयत्नशील आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.