श्रीगोंद्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान पडले महागात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सार्वजनिक ठिकाणीही अनेकजन मस्ती करताना देहभान हरपून जातात.असाच रस्त्यावर बेधुंदपणे मद्यपान करणे श्रीगोंद्यात नातेवाईक म्हणून आलेल्या काहींना चांगलेच महागात पडले. 

Loading...
श्रीगोंदा पोलिसांनी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या राहुल मारुती जगताप, नीलेश मारुती कापरे, नरेंद्र वसंत राणे, राजेंद्र सोनबा खेतमाळीस, प्रवीण रामसिंग पाटील, दत्ता आबाजी गायकवाड (सर्व रा. पेरणे फाटा, ता.हवेली, जि.पुणे), सचिन सुनील पलांडे (रा.मुखई ता.शिरूर जि.पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की, पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील सातजन शुक्रवारी लग्नानिमित्त श्रीगोंद्यात आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते परत जात असताना साधारणत: पाच वाजण्याच्या सुमारास ते श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्यावर आले तिथे त्यांनी त्यांच्याकडील चारचाकी वाहणे थांबवून रस्त्यावरच मद्यप्राशन करून गोंधळ करू लागले.

याबाबत त्या रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना माहिती दिली. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रवी जाधव, अविनाश ढेरे, गांगरडे वैभव, उत्तम राऊत, अमोल आजबे यांनी त्या ठिकाणी जावून या सर्वाना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले.

सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी राहुल मारुती जगताप, नीलेश मारुती कापरे, नरेंद्र वसंत राणे, राजेंद्र सोनबा खेतमाळीस, प्रवीण रामसिंग पाटील, दत्ता आबाजी गायकवाड (सर्व रा.पेरणे फाटा, ता.हवेली, जि.पुणे), सचिन सुनील पलांडे (रा.मुखई ता.शिरूर जि.पुणे) यांना ताब्यात घेवून, यांच्यावर कारवाई केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.