अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील बोटा येथून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना बुधवार दि. २० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. 

Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडीलांसोबत बोटा गावात राहत होती. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या मुलीला आमिष दाखवून व फूस लावून पळवून नेले आहे.

तिच्या वडीलांनी तिचा सगळीकडे शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गु.रजि.नं. ९८/२०१८ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.