कोयत्याने तरूणाला जबर मारहाण,गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्त्यामध्ये खड्डे केले ते बुजवून टाका. आम्हास शेतात जाता येत नाही, असे म्हटल्याच्या कारणाने आरोपीने हातातील कोयत्याने एका २१ वर्षीय तरूणाला मारहाण करुन जबर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कोतुळ येथे घडली आहे.


याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, जखमी फिर्यादी अशोक भाऊसाहेब चौधरी (वय २१, रा. आंभोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीसांनी आरोपी लक्ष्मण नामदेव गोडे, जितेंद्र लक्ष्मण गोडे, विठ्ठल नामदेव गोडे, भरत नामदेव गोडे (सर्व रा.कोतुळ) यांच्याविरुद्ध गु.र.नं. ११५/२०१८, भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादीच्या कोतुळ येथील घरासमोर ही घटना घडली. तुम्ही जे रस्त्यामध्ये खड्डे केलेले आहेत, तू बुजवून टाक, आम्हाला शेतात जाता येत नाही, असे म्हणल्याचा आरोपींना राग येवून त्यांनी चौधरी यास लाथाबुक्कयांनी मारहाण केली.

व आरोपी लक्ष्मण गोडे याने त्याचे हातातील कोयत्याने अशोक यास डोक्यात मारून जखमी केले व शिवीगाळ करून तुम्ही या रोडने जायचे नाही, नाहीतर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली. यावरून अकोले पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.