आजोबाचा खून करणाऱ्या नातवास जन्मठेप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर व्यसनाच्या आहारी गेलेल्या नातवास आजोबांकडे सुधारण्यासाठी ठेवण्यात आले, परंतु त्याने आजोबांचाच खून केला. याप्रकरणी विशाल चांगदेव गायकवाड (देवकर वस्ती, चोंडी, ता. जामखेड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

Loading...
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता अॅड. अनिल सरोदे यांनी बाजू मांडली. विशाल आई-वडिलांसह पुणे येथे राहात होता. व्यसन सुटेल, या आशेने आई-वडिलांनी त्याला गावी आजोबांकडे ठेवले होते. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री आजोबा चतुर्भुज ढाळे हे पडवीत झोपले असताना विशालने दगड व खोऱ्याने त्यांच्यावर वार केले. 

तो वारंवार पैशांची मागणी करत होता. आजोबांनी पैसे देण्यास नकार दिल्याने विशालने त्यांचा खून केला. नंतर आपल्या आईला तुझ्या बापाला मारल्याचे त्याने सांगितले. सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.