जामखेड पुन्हा हादरले,शेतकऱ्यावर गोळीबार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील केडगाव येथील दोन शिवसैनिक व त्यापाठोपाठ जामखेड येथील राळेभात बंधुची हत्याकांडाची घटना अद्याप नगरकर विसरले नाहीत. तोच परत एकदा जामखेड तालुक्यातील आगी येथे रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर, या शेतकऱ्यावर गुरूवार दि.२१रोजी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 

Loading...
या जीवघेण्या हल्यातून तेरकर हे सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत फिर्यादी रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर (वय ४३ रा.आगी ता.जामखेड) यांनी दिलेली फिर्यादीनुसार गुलाब दादासाहेब खरात, प्रशांत दादासाहेब खरात, दादासाहेब, नंदकिशोर खरात यांच्यासह इतर ७ ते ८ जण (सर्व रा.आगी ता.जामखेड) रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून बाहेर बोलावले. 

परंतु रवींद्र तेरकर हे भीतीपोटी बाहेर न येता घरातच बसून राहीले. वरील आरोपींनी घराच्या खिडकीची काच उघडून पाहिले व तेरकर यांना म्हणाले की तुला जगात जीवंत राहीचे असेल तर आमच्या विरोधात दिलेली फिर्याद मागे घे. नाही तर तुला जिवे ठार मारु, असे म्हणाले. त्यावर फिर्यादी त्यास आपण जे काही आहे ते सकाळी पाहू असे म्हणाले असता, वरील आरोपी पैकी एकाने तेरकर यांच्या दिशेने पिस्तूलातून गोळी झाडल. 

यावेळी ते खाली बसल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर गून्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. वरील सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक फैजदार विठ्ठल चव्हाण व पो काँ गहिनीनाथ यादव हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.