केडगावात जुगाराचा वादातून एकास बेदम मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगावमध्ये मुख्य चौकात असलेल्या एका हॉटेलसमोर बुधवारी रात्री साडेदहा वाजता एका इसमाने ‘सोरट’जुगारात हारलेले पैसे मागितल्याच्या कारणातून तीन जणांनी बेदम मारहाण केली.
Loading...

याबाबत सविस्तर असे कि,केडगाव येथे नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलसमोर ‘सोरट’ हा सोंगड्याचा डाव सुरू होता. या जुगारात हारलेल्या पैशांची मागणी करणार्‍या 24 वर्षीय युवकाला तीन जणांनी बेदम मारहाण केली. 

त्या युवकाने कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्यादी दिली. मात्र पोलिसांनी भादंवी कलम 323, 504 व 506 नुसार तक्रार नोंदविली, परंतु आरोपींविरुध्द ठोस कारवाई केली नाही.

केडगाव गावठाण येथील सनी भिवा मदने (वय 24) याला मारहाण करणार्‍या संतोष दत्तु कोतकर, मनोज दत्तु कोतकर व मोसीन पठाण (सर्व रा.केडगाव) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकाराने कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील जुगार अड्डे त्यांना पोसणार्‍या यंत्रणांविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.