चौंडीतील अहिल्यादेवी शिल्पसृष्टीची अज्ञात समाजकंटकांकडून मोडतोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय राज्यात पेटला असतांनाच आता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी उभारलेल्या शिल्पाची मोडतोड झाल्याचे समोर आले आहे,जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी येथे उभारण्यात आलेल्या काही मौल्यवान शिल्पाची अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड करण्यात आली आहे.


या संदर्भामध्ये शिल्पसृष्टीचे निर्माते माजी मंत्री अण्णा डांगे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथील शिल्पसृष्टीत 12 राशी बसविण्यात आल्या आहेत.  

Loading...

यामध्ये तुळ राशीच्या हातातील तराजू तोडून त्यातील लोखंडी साखळ्या चोरीस गेल्या आहेत. सहा खांब तोडून पाण्याच्या ठिबक सिंचनचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच सूर्याच्या रथातील चार साखळ्याही तोडून विद्धंवस करण्याचा प्रकार समोर आला आहे. 

मंगळवार दि.19 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे बाहेरगावी असल्यामुळे आज शुक्रवार दि. 22 जून रोजी या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष आ.रामहरी रुपनर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या आहेत.

दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी याची तात्काळ दखल घेऊन माहिती घेण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहे. या ठिकाणी असलेल्या शिल्पसृष्टी या अज्ञात समाज कंटकांनी दोन दिवसापूर्वी तोडल्याचा विषय पुढे आला. 

अण्णा डांगे हे बाहेरगावी असल्यामुळे ते काल चौंडीत दाखल झाल्यावर त्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जामखेड पोलिस ठाण्यामध्ये घडलेला प्रकार सांगून झालेल्या तोडफोड प्रकरणी त्यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.