अपघातानंतर वाहन चालकास बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागापूर-एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयाजवळ दोन टेम्पोंचा अपघात झाल्यानंतर एका टेम्पो चालकास चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी शिवाजी शंकर वणे (रा.श्रमिकनगर, पाईपलाईन रोड) यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागापूर-एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयाजवळ शिवाजी वणे यांच्या टेम्पोला मागून आलेल्या टेम्पोने धडक दिली. यावेळी वणे यांनी झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारला असता सौरभ संजय आहेर (रा.नवनागापूर) व त्याच्या टेम्पोचा चालक, कार्यालयातील कामगार यांनी शिवाजी वणे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच वणे यांच्या टेम्पोची काच फोडून पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.