श्रीरामपूर नगरपालिका पोटनिवडणुकीस स्थगिती.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पालिकेच्या प्रभाग १२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीस उच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अर. एम. बोर्डे व न्या. अरूण ढवळे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. अपात्रतेची कारवाई झालेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांना या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

संजयनगरमधून निवडून आलेल्या पवार यांच्या विरोधात पराभूत उमेदवार संजय छल्लारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पवार हे रयत शिक्षण संस्थेत नोकरीस असूनही संस्थेतून मिळाणाऱ्या पगाराची माहिती लपविल्याचा अक्षेप त्यांनी घेतला होता. 

Loading...
सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यास पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावेळी याबाबत मंत्रालयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

त्या प्रमाणे पवार यांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते; मात्र येथे अपील प्रलंबित असतानाच निवडणुकीची कार्यवाही पुढे जात होती. 

त्यामुळे पुन्हा पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. यावर सुनावणी झाली. पवार नोकरीस असलेली रयत शिक्षण संस्था पूर्ण अनुदानित असली, तरी तिच्यावर शासनाचे पूर्ण नियंत्रण नाही. 

त्यामुळे हे लाभाचे पद ठरू शकत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दोन्ही बाजुंचे म्हणने ऐकल्यानंतर न्यायालयाने या निवडणुकीस स्थगिती दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.