श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायतीत नागरिक व पदाधिकारी यांच्यात जोरदार हाणामारी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव ग्रामपंचायतच्या बाजूला राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरासमोर सांडपाणी साचत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोडही झाली. 

हे प्रकरण पोलिसात गेले, मात्र राजकीय मध्यस्थी आणि आपसातील वाद चव्हाट्यावर नको. म्हणून दुपारी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी समेट घडवत तक्रार देण्याचे टाळले. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या हाणामारीची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. हाणामारीचा प्रकार आपसात मिटला मात्र कार्यालयाचे नुकसान झाले.
Loading...


येथील ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकाच्या घरातील सांडपाणी जवळील एका नागरिकाच्या दारात साठून दुर्गंधी येत असल्यामुळे त्या नागरिकाने दि.२१ जून रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली त्याचे रूपांतर वादात झाले. 

बघता बघता त्या नागरिकाचे नातेवाईक कार्यालयासमोर जमा झाले. पदाधिकारी आणि तक्रारदाराचे नातलग यांच्यात तुफान हाणामारी झाली. यात ग्रामपंचायत कार्यालयासातील टेबल, खुच्र्या, कपाटातील वस्तूंच्या फेकाफेकीत अनेक वस्तूंची मोडतोड झाली. 

काहींच्या अंगावर मिरचीची पूड टाकून मारहाण केली. दोन्ही बाजूच्या समर्थकांचे कपडेही फाडले. घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस दाखल होताच गावातील वातावरण शांत झाले. 

प्रकरण वाढल्याने दोन्ही बाजूच्या समर्थकांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले. एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरु झाले. एकमेकांच्या विरोधात गुन्हे नको यात,

यामध्ये अनेकांची विनाकारण नावे येतील ही बाब लक्षात घेऊन दोन्ही बाजुच्या नेत्यांनी आपसात वाद मिटविण्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुढाऱ्यांना यश आले .पोलिसांनी ही प्रकरण आपसात मिटत असल्याने सुटकेचा श्वास सोडला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.