केडगाव हत्याकांड : विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड दुर्दैवी आहे. याबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा करून या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच सीआयडीच्या तपासी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या घटनेचे गांभीर्य त्यांच्या निर्देशनास आणून देणार असल्याचे आ. गोऱ्हे यांनी यावेळी सूचित केले. 

Loading...

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांना पुणे शहर शिवसेनेकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सेनेच्या प्रवक्त्या आ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २१) दुपारी केडगांव येथे हे धनादेश देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे पुणे उपशहरप्रमुख आनंद गोयल, सचिन खांदवे, बाळासाहेब भांडे, राजेंद्र धनपुडे, केदार कदम, नगरचे सेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, रमेश परतानी, नगरसेवक योगीराज गाडे, पप्पु भाले, अमोल येवले, प्रमोद ठुबे, नंदू ठुबे, अजित ठुबे, संग्राम कोतकर आदी उपस्थित होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.