कर्जत मध्ये वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्‍यातील धालवडी येथील शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. धालवडी येथील अरुण भीमराव चव्हाण ( वय 45) गुरुवारी सायंकाळी मेंढ्या चारून पिंपळवाडी रस्त्याने घरी येत होते.

Loading...
घरी परतत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वस्तीनजिक येताच त्यांच्या अंगावर वीज पडली. विजेच्या धक्‍क्‍याने ते जागेवर कोसळले. काही वेळातच 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी बोलाविण्यात आली. मात्र ती येण्यापूर्वीच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. 

अनेक वर्षांपासून ते मेंढीपालन व्यवसाय करीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यातच कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले. 

सायंकाळी सात वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथे हलविण्यात आला. पोलीस पाटील हेमलता पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली. चव्हाण कुटुंबाला कृषी विभागाच्या दोन लाख रुपयांचा अपघात विम्याचे सहाय्य मिळावे, अशी मागणी सेवा संस्थेचे अध्यय मोहन सुपेकर यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.