...त्यांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निरंजन सेवाभावी संस्थेने राज्यातील शिरूर कासार, नांदगाव, किल्ले रायगड परिसरातील 458 शेतकर्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. तसेच संस्थेने नगर जिल्ह्यातील 70 गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. 


उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी श्री. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनतर्फे 51 मुलांचे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी 11 मुलांचे पालकत्व स्वीकारले. यावेळी नरेंद्र फिरोदिया यांच्यासह किरण मनियार, अतुल डागा, प्रसाद बेडेकर, नीलेश बिहाणी आदी उपस्थित होते.

या वंचित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असून 2100 रुपयांत एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व अथवा एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगरच्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

येत्या शैक्षणिक वर्षात एक हजार गरजू मुलांना शैक्षणिक सुविधा या योजनेद्वारे देण्याचा संस्थेचा संकल्प आहे. यासाठी कार्याध्यक्ष म्हणून रविकांत काबरा व कार्यसचिव म्हणून स्वप्नील कुलकर्णी काम पाहत आहेत. पालकत्व स्वीकारू इच्छुकांनी अतुल डागा (मो. 8830710015) यांच्याशी संपर्क साधावा.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.