वाडिया पार्क संकुलातील तीन मोबाइल विक्रेत्यांवर गुन्हे दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील तीन मोबाइल विक्रेत्या दुकानात इंटेक्स मोबाइल कंपनीच्या प्रतिनिधींनी व कोतवाली पोलिसांनी संयुक्त छापे टाकले. मोबाइल दुकानांमध्ये इंटेक्स कंपनीच्या बनावट सुट्या भागांची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तीन विक्रेत्यांविरुद्ध कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

याप्रकरणी इंटेक्स कंपनीचे तपासणी अधिकारी निखिल पाटील यांनी कोतवालीत फिर्याद दिली. वाडिया पार्क संकुलातील अमेय मोबाइल शॉपी, आनंद भक्ती मोबाइल शॉपी व शिवसागर मोबाइल शॉपी या या दुकानांत छापे पडले. तेथे इंटेक्स कंपनीच्या मोबाइलचे सुटे भागांचा साठा सापडला. अमेय शॉपीमध्ये १६८ बनावट बॅटऱ्या, आनंद भक्ती शॉपीत ३१२, तर शिवसागर शॉपीत १४८ बॅटऱ्या व २०२ फ्लिप कव्हर्स आढळले. एकूण ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.