श्रीरामपूरमध्ये आई व मुलाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर  तालुक्यातील पढेगाव येथे शेताला पाणी देत असताना पहाटेच्या सुमारास तिघांनी काठ्यांचा धाक दाखवित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आंतोन गुलाब तोरणे, मंदा आंतोन तोरणे, रविंद्र आंतोन तोरणे अशी आरोपींची नावे आहेत. संदीप राधाकृष्ण आहेर (रा. पढेगाव) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. ३१) पहाटे पाच वाजेच्या सुमारास संदीप व त्यांची आई विठाबाई आहेर शेतात घासाला पाणी देत होते. त्यावेळी वरील आरोपींनी तेथे येवून संदीप व आईला मारहाण करत काठ्यांचा धाक दाखवून विठाबाई यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. पोलिस निरीक्षक वसंत पथवे याप्रकरणी तपास करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.