माजी सभापतींवर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार यांच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मंगेश नाझर गव्हाणे यास ३ वर्षानंतर ताब्यात घेण्याची कारवाई नगर ग्रामीणचे सहा. पोलिस अधिक्षक मनिष कलवाणिया यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुदाम पवार हे पारनेर पंचायत समितीचे सभापती असताना राजकीय वादातून त्यांच्यावर गव्हाणे याच्यासह काही जणांनी हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील काही आरोपींना पोलिसांना तात्काळ ताब्यात घेतले होते. मात्र मंगेश गव्हाणे तेव्हापासून फरार होता. तब्बल तीन वर्षानंतर त्याला पकडण्यात पेालिसांना यश आले असून गव्हाणे हा कोहकडी गावच्या शिवारात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत श्री. कलवाणिया यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने कोहकडी शिवारात सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.