अहमदनगर जिल्हा कारागृहात आंतराष्ट्रीय योग दिन साजरा बंदिवानांनी केले योगासने


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त संपुर्ण भारत योगमय बनले असता, कारागृहातील बंदिवानांनी देखील योगासने करुन योग दिन साजरा केला. अहमदनगर जिल्हा कारागृहात आंतराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Loading...
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधिक्षक नागनाथ सावंत, वरिष्ठ तुरुंग अधिकारी (सिनीयर जेलर) श्यामकांत शेडगे, आंतराष्ट्रीय योग शिक्षक रुणाल जरे पाटील, डॉ.सुधा कांकरिया, योग शिक्षक रत्नाकर जोशी, रेखा जरे पाटील, डॉ.संजय खंडागळे आदींसह कारागृहाचे कर्मचारी व बंदिवान उपस्थित होते.

नागनाथ सावंत म्हणाले की, योग व प्राणायामने बंदिवानांमध्ये बदल होणार आहे. त्यांचा मानसिक तणाव दूर होवून ते निरोगी राहण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांची मानसिकता बदलून भविष्यात व्यसनापासून देखील ते अलिप्त होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

श्यामकांत शेडगे यांनी शाररीक व मानसिक व्याधीवर योग व प्राणायाम गुणकारी असल्याचे सांगून, ध्यान धारणेने बंदिवानांचे मानसिक संतुलन देखील उत्तम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नाकर जोशी यांनी प्राणायाम बद्दल शास्त्रीय माहिती देवून, त्याचे लाभ सांगितले. तर डॉ.सुधा कांकरिया यांनी मेडिटेशन (ध्यान) चे बद्दल मार्गदर्शन केले. 

चायना येथे योग शिक्षक म्हणून कार्यरत असलेला आंतराष्ट्रीय योग शिक्षक रुणाल जरे पाटील याने बंदिवानांना योगाचे धडे दिले. विविध आसन प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. तसेच निरोगी जीवनासाठी दररोज योग व प्राणायम करण्याचे आवाहन केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.