गोरक्षक मारहाप्रकरणी मुख्य आरोपी नगरसेवक फरार,दोघांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गोरक्षकांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य आरोपी असलेला नगरसेवक फरार आहे. गुन्हा दाखल केलेल्या ६२ जणांपैकी सोहेल फैरोज कुरेशी व कासिफ असद कुरेशी यांना अटक करण्यात आली असून उर्वरित सर्व आरोपी पसार झाले आहेत. या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला आहे.

Loading...
संगमनेर येथून गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा पाठलाग करतात, असा संशय मनात धरुन तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या मागे व खांडगाव फाटा या दोन्ही ठिकाणी मंगळवार दि. १९ जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १२ जणांसह इतर ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशुतोष शरद भुजबळ (वय २४) हा गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे राहतो. 

तो व त्याचे दोन मित्र हे पुणे-नाशिक महामार्गाहून मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास संगमनेरकडे येत होते. त्याचवेळी तेथून जात असलेल्या पिकअप गाडीतून गोवंश जनावरे घेऊन जात असल्याचा संशयावरुन त्यांनी वाहन चालकास विचारपूस केली. 

त्यावेळी चालकाने भुजबळ याला मारहाण करत सदर वाहनातून मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठिमागे व खांडगाव फाटा या दोन्ही ठिकाणी जबर मारहाण केली. या प्रकरणी आशुतोष भुजबळ याने दिलेल्या फिर्यादीवरुन ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोहेल फैरोज कुरेशी व कासिफ असद कुरेशी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.