अंगाला वीज स्पर्श करुन गेली, महिला गंभीर जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर  तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवाराततील बावपठार येथील मनिषा प्रकाश भागवत (वय ३३) यांना वीज स्पर्श करून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. १९ जून रोजी सायंकाळी घडली.

Loading...
मनिषा भागवत या मंगळवारी सायंकाळी आपल्या मुलासह जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. पण विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने मुलगा हा पुढे आला होता. तर मनिषा याही शेतातून चाऱ्याचे ओझे डोक्यावर घेऊन घरी येत असताना त्यांच्या अंगाला वीज स्पर्श करुन गेली. 

त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या आणि खाली कोसळल्या. मनिषा या घरी न आल्याने त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी शेताकडे गेले असता तर त्या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे मनिषा यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.