कोपरगावात शिवसेनेच्या दोन गटांत राडा, धुसफूस चव्हाट्यावर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहर शिवसेनेत पडलेल्या दोन गटांत बऱ्याच दिवसांपासून धुसफूस चालू होती. झावरे व सनी वाघ या दोन गटांत यापूर्वी अनेक वादावादी झाल्या. सनी वाघ यास काही दिवसांपूर्वी झावरे यांच्याकडून धमक्‍या आल्याचे समजते. त्याच कारणावरून सनी वाघ व झावरे गटात गुरुवारी संध्याकाळी वादावादी झाली. त्याच वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले आहे.

हाणामारीत लोखंडी रॉड, चॉपर, लाकडी दांडक्‍यांचा वापर झाला. या मारहाणीत तीन ते चार जण जखमी झाले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 20 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेनेचे परंतु सनी वाघ गटाचे कार्यकर्ते अजय प्रकाश शेळके यांनी शंभू झावरे, बोनी उर्फ सिद्धांत झावरे, विशाल झावरे, गुड्डू झावरे (सर्व रा. कालेमळा, कोपरगाव), संतोष आंबेकर, (रा.कर्मवीरनगर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

त्यात म्हटले की, आरोपी विक्रांत झावरे, प्रवीण देशमुख यांनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच, आरोपी शंभू झावरे याने देखील फिर्यादी व फिर्यादीचा मित्र सनी वाघ यांना फोनवर शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व सनी वाघ बसस्टॅण्ड येथे गेले होते. 

त्यावेळी आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्याकडील लोखंडी रॉड, चॉपर, लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी फिर्यादी व सनी वाघ यांना मारहाण करून जखमी केले आहे. भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 504 आर्म ऍक्‍ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात सिद्घांत रवींद्र झावरे (रा. कालेमळा, कोपरगाव) यांनी सनी रमेश वाघ, सिद्धार्थ रमेश वाघ, अजय प्रकाश शेळके, विपुल अनिल गायकवाड व दोन अनोळखी इसमांविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

त्यात म्हटले की, फिर्यादी हा भरकादेवी रसवंतीगृह येथे असताना 30 मे रोजी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून सनी रमेश वाघ याने फिर्यादीस अचानक पाठीमागे येऊन त्याच्या हातातील लोखंडी रॉडने डोक्‍यात मारले. त्यात फिर्यादीचे डोके फुटले. 

अजय सिद्धार्थ, रमेश वाघ याने लाकडी दांडक्‍याने मारहाण केली व अजय प्रकाश शेळके याने हातात चॉपर घेऊन व विपुल अनिल गायकवाड याने हातात फायटर घेऊन तसेच अनोळखी दोन इसमांनी फिर्यादीस पकडून ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.