आमदार राहुल जगताप यांनी केली ठेकेदाराची कानउघाडणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-दौंड-बारामती-फलटण-विटा-सांगली व म्हैसाळ मार्गे बेळगांव या रस्त्याच्या पहिल्या ९३ कि.मी.चे काम अहमदनगर ते वासुदेफाटा दरम्यानचे काम शासनाने नेमलेल्या ठेकेदारांमार्फत चालू आहे. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. 

Loading...
तसेच प्रवासी वाहतुकीच्या नियोजनावरून वारंवार अडचणी येतात. याबाबत आमदार जगताप यांच्याकडे वारंवार तक्रारी आल्यामुळे आमदार जगताप यांनी याबाबत दखल घेवून ठेकेदारास कामाबाबत प्रसिध्दीपत्रकाव्दारे सुचना केल्या आहेत.

या पत्रकात म्हटले आहे की, स्त्याच्या कामाच्या व रस्त्यासाठी वापरात येणाऱ्या मटेरिअलच्या गुणवत्ता व दर्जाबाबत स्थानिक प्रवासी, नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.तसेच वाहतुकीसाठी ज्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे त्या पर्यायी रस्त्यावर 'काम चालू असल्याने काळजी घेणे,' दिशा दर्शविणे इ. माहिती देणारे फलक तसेच अपघात होवू नये म्हणून रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स लावणे गरजेचे असताना बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे फलक, बॅरिकेटस लावले नाहीत. त्यामुळे सतत छोटेमोठे अपघात घडत आहेत. 

या पर्यायी रत्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने, व माती असल्याने व पावसामुळे चिखल होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. 

व्याबाबत कार्यकारी अभियंता श्री.गुप्ता यांना त्वरीत सुधारणा व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर कामाच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार, दक्षता व गुणनियंत्रण समिती या संयुक्त पथकासह पाहणी व विविध ठिकाणची नमूना चाचणी लवकरच करणार आहे. 

कामामध्ये गुणवत्ता व दक्षतेबाबत दोष आढळल्यास झालेले काम अंदाजपत्रकातील अटी व शर्ती व गुणवत्तेप्रमाणे होईपर्यंत पुढील काम होवू देणार नाही. 

तसेच कुठल्याही स्थानिक ठेकेदाराला कामाचा ठेका दिला म्हणून दर्जा व गुणवत्तेबाबत कसलीही व कोणचीही गय केली जाणार नाही. असे या पत्रकात आमदार जगताप यांनी म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.