पत्रकारास जिवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-जामखेड रोडवरील सारोळाबद्दीच्या शिवारात तीन अज्ञातांनी पत्रकार आजिनाथ रामदास शिंदे (वय ३२, रा.भातोडी,ता.नगर) यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिंदे हे कामासाठी भातोडी येथून येत असताना नगर-जामखेड रस्त्यावर सकाळी साडे नऊच्या सुमारास सारोळा बद्दीच्या माथ्यावर नगरकडून येणाऱ्या एका स्वीफ्ट डिझायर चारचाकी वाहनातून आलेल्या तिघा जणांनी शिंदे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. 

तसेच शिंदे यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिंदे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई करेवाड करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.