आमदारांवर सोशल मिडीयावर 'अपशब्द' पडले महागात ! तिघांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांच्याबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरल्या प्रकरणी तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील तीन महाविद्यालयीन तरुणांवर मंगळवारी सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. 


या सबंधीची फिर्याद स्वत: आ. विजय औटी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे केली होती. त्यानुसार या तीन तरुणांविरोधात सायबर क्राईमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 

Loading...
याबाबतची अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील मा. सरपंच शिवाजीराव ढोमे यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मंगळवारी दुपारी शिवसेनेचे आ. विजय औटी यांच्याबाबत अपशब्द असणारा मॅसेज़ आला. यामुळे फिर्यादीची प्रतिमा मलिन झाली असून, अब्रुनुकसान प्रकरणी अहमदनगर येथील सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हा गुन्हा पारनेर पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर या तीनपैकी दोन महाविद्यालयीन तरुणांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.