संगमनेरमध्ये बंद टोलनाक्यावर पुन्हा अपघात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील रस्त्यावरील बंद टोलनाक्यावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मालट्रकचा अपघात झाला. ट्रक टोलनाक्याचा दुभाजकात अडकला. त्यामुळे याठिकाणचे टोलनाक्याचे साहित्य दुभाजकासह हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Loading...
संगमनेर- लोणी रस्त्यावर वडगावपान शिवारात असलेला टोलनाका शासनाने बंद केला; मात्र याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पाऊस सुरू असताना संगमनेरकडून लोणीच्या दिशेने चाललेला मालट्रक (टीएन ५२ सी ५५८५) हा टोलनाक्याजवळील दुभाजकात अडकला. 

अपघातात मालट्रकची पुढील दोन्ही चाकांचं नुकसान झालं. याठिकाणी सहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. आता पुन्हा अपघात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभुत वडगावपान परिसरातील बंद टोलनाक्याचे सर्व साहित्य हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.