सरकारी कामात अडथळा आणल्याने तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बुरुडगाव येथील कचरा डेपोसमोर मृत जनावरे टाकण्यास गेलेल्या वाहन चालकास वाहन अडवून जनावरे टाकण्यास मज्जाव करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू डेनियल कांबळे (वय ३८, रा. मेहराबाद, अरणगाव) हे बुरुडगाव कचरा डेपोसमोर असताना त्यांचे वाहन (एम. एच. १६ टी. २६७) मधून शहरातील मृत जनावरे घेवून जात असताना बुरुडगाव कचरा डेपोसमोर राधाकिसन कुलट व त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी दोघे जण यांनी वाहन अडवून मृत जनावरे टाकायची नाही असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात कांबळे यांच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोसई. एम. के. क्षीरसागर हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.