लहान मुलास भीक मागायला लावणाऱ्या वडिलांविरुद्ध गुन्हा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वडिलांनीच आपल्या चार वर्षाच्या लहान मुलास नशिले पदार्थ पाजून भिक मागायला लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी चाईल्ड लाईनचे अलिम आयुश पठाण यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
दरम्यान या प्रकरणातील लहान मुलास चाईल्ड लाईनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शहरातील कोठला परिसरात रस्त्यावर एक लहान मुलगा भिक मागत असल्याचे नागरिकांना दिसले. पाथर्डी येथील एका व्यक्तीने त्याच्या चार वर्षाच्या मुलास नगर शहरात आणले व मुलाला नशिले पदार्थ पाजून शहरात भीक मागण्यास सोडून दिले होते.

या प्रकरणी शहरातील स्नेहालय या सामाजिक संघटनेला माहिती मिळाल्यावर स्नेहालयच्या चाईल्ड लाईनच्या पथकाने मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. या प्रकरणी मुलाला भिक मागण्यास भाग पाडणाऱ्या राजु वैरागर याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.