मर्द असाल तर हायकोर्टात लढून दाखवा, दमानियांचं खडसेंना आव्हान !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खरे मर्द असाल तर आपल्या विरोधात हायकोर्टात लढून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे. तसेच, मुद्याच्या लढाईमध्ये असे दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले, तरी आपण त्यांच्याविरोधात लढा देऊ, असेही त्या म्हणाल्या. 

अंजली दमानिया यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधला. आपल्याला बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी आपल्या विरुद्ध बनावट दस्ताऐवज आणि बनावट चेक तयार करुन उच्य न्यायालयाची दिशाभूल केल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते.

Loading...
याच कारणास्तव त्यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फिर्याद दाखल करुन, दमानिया यांच्या विरोधात विविध कलमांखाली मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेतली होती.

एकनाथ खडसे यांनीच आपल्या आमदारकीचा दुरुपयोग करून आणि पोलिसांच्या कनेक्शनची दुरुपयोग करून पोलीस आणि न्यायालयाची दिशाभूल करून आपल्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र हे सर्व खोटं असल्याने आपण स्वतःहून आज जळगाव पोलिसांच्या समोर हजर होणार आहे, मी जर चूक असेल तर माझ्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे दमानिया म्हणाल्या.

तसेच, खडसे खरे मर्द असतील त्यांनी माझ्याशी हायकोर्टात मुद्याच्या लढाईमध्ये लढून दाखवावे, असे आव्हान दमानियांनी खडसेंना दिले. मुद्याच्या लढाईमध्ये असे दहा खडसे आणि दहा भुजबळ एकत्र आले तरी आपण त्यांच्या विरोधात लढा देऊ असेही त्या म्हणाल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.