शेतकऱ्यांची पोर आगामी निवडणुका लढवणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संभाजी ब्रिगेडने संघटन बांधणी व शेतकरी-कष्टकरी-कामगारांच्या समस्या समजावून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. शेतकर्‍यांच्या पाठिशी संभाजी ब्रिगेड कायम राहिली आहे. आगामी लोकसभेच्या राज्यातील 30 तर विधान सभेच्या 100 जागा लढविण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी केली. 

Loading...
या प्रसंगी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, नीलेश तनपुरे, डॉ. राहुल देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुभाष वाघ, संघटक विजय खेडकर, सचिन काकडे, ज्ञानदेव जगताप, दादा दानवे, शरद काकडे, आशिष साबळे आदी उपस्थित होते. 

खेडेकर हे संभाजी ब्रिगेडच्या संघटन बांधणीसाठी नगरला आले होते. खेडेकर म्हणाले, शेतकर्‍यांची मुले खासदार, आमदार झाली तर त्यांचे प्रश्‍न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळणार आहे. लोकसभेच्या 30 तर विधानसभेच्या 100 जागा संभाजी ब्रिगेड लढविणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.