...एकेकाळी दरवाजे नसलेल्या शनि शिंगणापुरात आता सरकार पहरेदार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवरच आता शनी शिंगणापूरचं ट्रस्टही राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणार आहे,मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

शनिशिंगणापूर देवस्थानवर आता राज्य सरकारचे नियंत्रण राहणार असून देवस्थानवर विश्‍वस्त मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय आज  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायद्यावर चर्चा करण्यात आली.

Loading...
शनि शिंगणापूरचा देशभरात खूप मोठा भक्तवर्ग आहे. दरवर्षी तिथे लाखो भक्त दर्शनाला येतात. मध्यंतरी महिला प्रवेश बंदीवरूनही हे देवस्थान चर्चेत आलं होतं. पण ग्रामस्थांनी ट्रस्टवर गावातल्याच महिलेची नियुक्ती करून या वादावर पडदा टाकला.

शनिभक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे, आता भक्त म्हटलं म्हटलं की देणगी आलीच. आजमितीला या ट्रस्टची आर्थिक उलाढालही कोट्यावधींच्या घरात आहे. भक्तांच्या या देणगीचं रक्षण व्हावं. म्हणून एकेकाळी दार नसलेल्या शनि शिंगणापुरात सरकार पहरेदार असणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.