विजेचा प्रवाह घरात उतरल्याने सिद्धार्थनगरमध्ये युवकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सिद्धार्थनगरमध्ये घरात वीजप्रवाह उतरल्याने कपडे सुकवायच्या तारेला चिकटून मयूर विजय क्षीरसागर (वय २०) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. मयूर एकुलता एक मुलगा असल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. 

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप व्यक्त करत नागरिकांनी चौकशीची मागणी केली. मयूरच्या घराच्या वरच्या बाजूने महावितरणची सर्व्हिस वायर गेली आहे. या वायरला जोड आहे. त्या जोडाला वीजरोधक टेप लावलेला नव्हता. 

गुरुवारी रात्री जोरदार वादळ झाले. वादळामुळे ही वायर पत्र्यावर पडली. त्यामुळे मयूरच्या घरात वीजप्रवाह उतरला. पहाटे मयूर टॉवेल घेण्यासाठी गेला असता तो टॉवेल टाकलेल्या तारेला चिकटला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.