जामगावमध्ये भव्य रक्तदान शिबीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील जामगाव येथे शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आज भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


जामगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख सुजित झावरे यांच्यासह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

1 जून असल्याने देशव्यापी शेतकरी संप सुरू आहे. शेतात कष्ट करून देशाला अन्न पुरवणार्‍या शेतकर्‍यांविषयी आदर व्यक्त करून कार्यकर्त्यांनी राबविलेले रक्तदान शिबीर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी काढले.

पांडूरंग हिलाळ, प्रसाद मेहेर, नवनाथ काणे, अजय लोंढे, मनोज शिंदे, रमेश मेहेर, संदीप घोडके, प्रितम पानमंद, बाबू तराळ यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.वसंतराव झेंडे, डॉ.विलास मढीकर आदी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.