शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी विलास बळीराम गाढे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येस नगरपंचायत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी,अशी मागणी नातेवाईकांनी करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सदर मृतदेह नगरपंचायत कार्यालयात आणुन ठिय्या मांडला. उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने तवाण निवळला.

दरम्यान, कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर कायदेशीर मार्गाने नियमानुसार मयत गाढे यांच्या वारसास नगर पंचायतमध्ये कामावर घेतले जाईल, असे पत्र मुख्य लिपीक मुरलीधर देसले यांनी मुख्याधिकारी यांच्या वतीने देण्यात आले.

नगरपंचायतमध्ये बांधकाम विभागात विलास बळीराम गाढे (वय ४५) रा. मातोश्रीनगर,शिर्डी यांनी ३१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात आणण्यापुर्वीच ते मयत झाले होते. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूस नगरपंचायतचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कारवाईची मागणी करत नगरपंचायत कार्यालयात मृतदेह आणुन संताप व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.