सत्ताधारी सेनेची मनमानी, सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात निधीची खैरात आणि विरोधक वंचित !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षपात करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात निधीची खैरात आणि विरोधकांना मात्र वंचित ठेवले जात आहे. असा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती गणेश भोसले यांनी केला आहे. तर निधीचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्याची मागणी त्यांनी प्रभागी आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Loading...

मनपामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे निधी देताना शिवसेनेच्याच नगरसेवकांना प्राधान्य दिले जात आहे. मनपामध्ये फक्त शिवसेनेचेच नगरसेवक नाहीत. सत्ताधाऱ्यांनी विकासासाठी निधी देताना सर्व 72 नगरसेवकांचा समान विचार केला पाहिजे. 

शिवसेना सत्तेत आल्यापासून विरोधकांना विकास निधीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. विरोधकांनी सुचविलेल्या एकाही विकास कामाला निधी दिला गेला नाही. त्याचा परिणाम इतर प्रभागांच्या विकासावर होत आहे.

भोसले यांच्या प्रभागातील भोसले आखाडा येथील समर्थ नगर, आनंद कॉलनी आदी भागातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. अशा विविध गरजेच्या कामांसाठी देखील मनपामधून निधी दिला जात नाही. प्रत्यक्षात सर्व नागरिकांच्या सुविधांचा विचार डोळ्यापुढे ठेवूनच निधी वाटप होणे आवश्‍यक असते. ते या सत्ताधाऱ्यांकडून होत नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.