जनावरांच्या गोठ्यात नेऊन सात वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरासमोर खेळत असताना सात वर्षांच्या बालिकेला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर तेरा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नेवासे तालुक्यात घडली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, २९ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला जनावराच्या गोठ्यात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर मुलीची अवस्था पाहून तिला विश्वासात घेऊन आईने विचारले असता तिने झालेली घटना सांगितली. 

आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी ३० रोजी पोलिसात तक्रार दिली नव्हती. पण त्यानंतर ३१ मे रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेतील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाने अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.