राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. ऍड. प्रताप ढाकणे आणि संदीप वर्पे यांच्यात आता जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच आहे. दरम्यान आज होणाऱ्या मुलाखतीही रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील बऱ्याच जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असली, तरी नाशिक महसूल विभागातील एकाही जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.नगर जिल्हा हा राज्यातील सर्वांत मोठा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष लक्ष असलेला जिल्हा. Loading...
पूर्वी या जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच आमदार निवडून येत. अशा या जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुले,सुजीत झावरे,ऍड. प्रताप ढाकणे,संदीप वर्पे ,राजेंद्र कोठारी,राजेंद्र फाळके सहा नावे चर्चेत होती. 

आज या सहा जणांना मुंबईला बोलविण्यात आले होते. मात्र पवार, पिचड, दिलीप वळसे पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार होते. कोकण विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार यांच्यासह बहुतांश नेते गुंतल्याने ही बैठकच रद्द करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.