पालकमंत्री प्रा.राम शिंदेंमुळे विकासकामांना गती.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड नगरपरिषदेची निवडणूक होऊन दीड वर्ष झाले तरी विकासकामांना निधी मिळत नव्हता. परिणामी जनतेचा रोष पत्कारण्यापेक्षा सत्ताधारी गटाला सोडचिठ्ठी देऊन नगरपरिषदेमध्ये सत्तांतर घडवण्यासाठी पुढाकार घेतला. वर्षभरातच पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने निधी मिळाला, यामुळे प्रभागाचे नव्हे, तर शहराचे रुप बदलत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी केले. 

नगरसेवक सय्यद यांनी प्रभाग सहामधील भुयारी गटारे, कॉंक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक असे विविध कामे केल्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोपल सर होते. 


Loading...
या वेळी प्रास्ताविकात जाकीर सर म्हणाले, शामीरभाई सय्यद यांचे सामाजिक व राजकीय कार्य गेल्या पंधरा वर्षांपासून शहरासह तालुक्यात चालू आहे. वर्षभरात त्यांनी प्रभागात केलेली विकासकामे पाहता त्यांनी भावी काळात शहराची जबाबदारी स्वीकारावी. त्यांची काम करण्याची पध्दत व परखड विचारधारा सर्व समाजात असलेल्या बांधिलकीचा त्यांना राजकारणात फायदा होईल. 

या वेळी प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक शामीरभाई सय्यद यांचा श्रीफळ, शाल, फेटा देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना सय्यद म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वर्षभरात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे मार्गी लागली आहेत. 

खर्डा चौक ते आमरधामपर्यंत रस्त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असून, निविदाही मंजूर झाल्या आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होईल. प्रभागातील कामे होताना स्वत: लक्ष दिले आहे. यापुढील काळात प्रभागाबरोबरच शहरातील विकास कामांवर भर दिला ज़ाईल. प्रभागातील कार्यकर्त्यांनी शहराचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे. 

यापुढील काळात त्या दिशेने वाटचाल करण्याचे सूतोवाच नगरसेवक सय्यद यांनी केले. या वेळी रफिकभाई बेग, इस्माईलभाई पाटेवाले, दत्तात्रय चऱ्हाटे, नदीम शेख, दादासाहेब बोराडे, मुन्नाभाई पठाण, सय्यद समीर टेलर, निकाळजे सर, विजयकुमार नागवडे, गायकवाड मेजर, अझहरखान, तौफिक शेख, सचिन शिंदे, विकास अष्टेकर, आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.