नगर-जामखेड रोडवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-जामखेड रोडवरील दशमीगव्हाण गावाच्या शिवारात रविवारी (दि. १७) पहाटे ४.३० वा. च्या सुमारास नगरहून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महेश नारायण मोरे (वय ३२, रा. आठवड, ता. नगर) हा त्याच्या दुचाकीवरुन (एम.एच.१२ डीआर ६०४३) जामखेड रोडने जात असताना नगरकडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने (पीवाय ०५ ई १९८४) मोरे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत महेश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गणेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.