सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पावसाळ्यात कोणत्याही पर्यटन स्थळी आपला जीव धोक्यात घालू नका असं वारंवार सांगत असतानाही सेल्फी काढण्याचा मोह काही केल्या जात नाही आणि त्यातून एक 35 वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला आहे.
Loading...

दिल्ली येथून माथेरानला फिरण्यासाठी 5 जणांचं चौहान कुटुंब आलं होतं. ते फिरत असलेल्या पॉईंटला सुरक्षा कठडा असूनही चौहान दाम्पत्य कठड्याबाहेर सेल्फी काढत होते. पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत होते आणि वाऱ्याच्या झोकात सरिता या 600 फूट खोल दरीत कोसळल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पोलीस त्वरित घटना स्थळी पोहोचले असून माथेरान मधील सहयाद्री रेस्क्यू टीम आणि हशाची पट्टी येथील आदिवासी यांनी रात्री उशीरापर्यंत महिलेचा शोध घेतला. रात्री उशिरा या मृत महिलेला बाहेर काढण्यात यश आलं.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.