पुणतांब्यात शेतकऱ्यांकडून सरकारचे प्रतिकात्मक वर्षश्राध्द घालून निषेध.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-शेतकरी संपाला १ जून रोजी वर्षपूर्ती झाली तरी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच डॉ.धनंजय धनवटेंच्या नेतृत्वाखाली सरकारचे प्रतिकात्मक वर्षश्राध्द घालून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

संगमनेरमध्ये अज्ञात आंदोलकांनी टॅँकरमधील दूध रस्त्यावर ओतून दिले. तर अकोलेत किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या तहसील कार्यालयाला घेराव घालण्याबरोबरच या कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. 

सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर १ जून च्या शेतकरी संपाला एक वर्ष पूर्ण झाले मात्र सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवले. त्याच्या निषेधार्थ सरकारचे प्रतिकात्मक वर्षश्राध्द घालण्यात आले. शेतकऱ्यांनी काळ्या टोप्या घालून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.