राजीव राजळेंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार - आ. मोनिका राजळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्यावर येथील तळागाळातील जनतेने प्रेम केले असून, त्यांच्या हातून राहिलेली विकासकामे पूर्ण करून मी त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे,असे मत आ. मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. 


ईदनिमित्त शेवगाव तालुक्यातील हातगाव व बालमटाकळी येथे मुस्लिम बांधवांनी आयोज़ित केलेल्या शिरखुरमा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्यापासून ते आजपर्यंत या परिसराने राजळे कुटुंबाला सतत साथ दिली आहे.

स्व. राजीव राजळे यांचे या भागाशी अतुट नाते होते. राज़ीव राज़ळे यांच्या हातून राहिलेली विकासकामे आपण पूर्ण करणार असल्याचा संकल्प केला असून, तो पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय राहणार नाही. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी आयोज़ित केलेल्या शिरखुरमाच्या कार्यक्रमामुळे हिंदू व मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागले.

Loading...
तसेच वैचारिक देवाण-घेवाण होऊन समाजामध्ये चांगला संदेश जातो, असे शेवटी राज़ळे म्हणाल्या. या वेळी हिदायत पठाण, डॉ. नीलेश मंत्री, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, नवनाथ कंगणकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास भाज़पा तालुकाप्रमुख बापूसाहेब पाटेकर, सुरेश नेमाण यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी रसूलभाई शेख, आमिनभाई शेख, हिदायत पठाण, चाँदभाई शेख, फत्रुभाई पठाण, शाबुद्दिन शेख, बाबुलाल शेख, लालभाई शेख, आश्पाक शेख, शकील शेख, बडेसाहेब शेख, नसीर शेख, मौलाना तौफिक रजा, अजमोद्दिन पठाण यांनी परिश्रम घेतले आहेत. या वेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

बालमटाकळी येथील कार्यक्रमासाठी कासमभाई शेख व महेबूब शेख यांनी प्रयत्न केले. या वेळी तुषार वैद्य, संदीप देशमुख, अशोक खिळे, अनिल परदेशी, विक्रम बारवकर, दिगंबर टोके, राजेंद्र छाजेड, अप्पा घुले, पंडित मगर, मिठू काजळे, बबन लोणकर, सखाराम वाघुंबरे, भाऊराव गायके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.