ढंपरखाली चाकाखाली सापडून कामगाराचा जागीच मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे डंपरखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Loading...

ही घटना मंगळवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यात कामगार असलेले संपत नारायण सहाने ( वय ५५, वरवंडी) हे दुचाकीवरून (एम एच १७ ए आर ५२८४) जात होते. घुलेवाडी परिसरातील राजपाल कॉर्नरसमोर डंपरखाली डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.