नेवासेत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा जनावरांसह वाहन पकडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कत्तल करण्यासाठी चालवलेल्या सहा गायांसह पीकअप गाडी नेवासा पोलिसांनी सापळा लावून पकडली. सुमारे तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...
पोलीस हवालदार भरत शेषराव घुगे यांनी फिर्याद दिली असून याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री श्रीरामपूरकडून खडकाफाटा मार्गे औरंगाबादकडे काही व्यक्ती कत्तलीच्या इराद्याने पिकअप (क्र. एमएच २० इजी ०१९५) यातून जनावरांची वाहतूक करणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सहायक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना मिळाली. 

हे वाहन पकडण्यासाठी नेवासा बाजार समिती समोर औरंगाबाद मार्गावर सापळा लावण्यात आला. रात्री नऊच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने येणारी पिक-अप येताना दिसली. पोलिसांनी सदरची गाडी अडवून घ्यायला सांगितले. या गाडीमध्ये चालकसह एक व्यक्ती होता. 

त्यांना पिकअपमध्ये काय आहे विचारले असता त्याने जनावरे आहे असे सांगितले. त्यानंतर पिकअपची पाहणी केली असता त्याला ताडपत्रीने मागील भाग बंद केला होता. सदरची ताडपत्री वरून पहिले असता आतमध्ये सहा गाया दाटीवाटीने भरून वाहतूक चालू होती. 

पोलिसांनी सहा गायांसह एक पिकअप गाडी असा तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून अमजद सुभानखान कुरेशी (वय २५, रा.नारेगाव जि. औरंगाबाद) व सय्यद नजीर सय्यद उस्मान (वय ४१, रा. संजयनगर, जि. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.